कोतोली (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल पालेकर (कसबा ठाणे) यांची तर महिला जिल्हा उपाध्यक्षपदी आम्रपाली गायकवाड (पोखले) यांची निवड करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पन्हाळा तालुका नवीन कार्यकारिणीची निवड जिल्हाध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, ती पुढील प्रमाणे : पन्हाळा तालुका उपाध्यक्ष- दामाजी जाधव (यवलूज) सरदार कांबळे (माळुंगे), गणेश कुंभार (आळवे), अक्षय कोळी (पडळ), पन्हाळा तालुका महासचिव- गौतम कांबळे (देवठाणे), रणजित कांबळे (मळुंगे), आत्माराम कांबळे (पुशिरे). यावेळी रावसाहेब निर्मळे, वैशाली कांबळे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह वंचित पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.