Breaking News

 

 

‘पीएम मोदी’ला मुंबई हायकोर्टाचा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम मोदी’ या हा चित्रपट ६ एप्रिललाच प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेचे कारण देत या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावली. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने मोदी यांची भूमिका साकारली असून ओमंगकुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. लोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडाव्यात यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्यात यावी अशी मागणी रिपाइं (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

चित्रपटाला विरोध नाही, परंतु हा चित्रपट ऐन निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यात येत आहे. तो निकालानंतर प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र हे कारण सयुक्तिक नसल्याचे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपट आता ६ एप्रिललाच प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा