कोल्हापूर :  महापालिकेच्या वतीने केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. केशवराव भोसले नाटयगृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, अखिल भारतीय मराठा नाटयपरिषदेचे अध्यक्ष अनंद कुलकर्णी, केशवराव भोसले यांचे नातू मोहनराव शिंदे, मिलींद अष्टेकर, गिरीश महाजन, सहायक अभियंता नि‍शिकांत फप्पे, कनिष्ठ अभियंता बराले, केशवराव भोसले नाटयगृहाचे व्यवस्थापक समीर महाब्री व कर्मचारी उपस्थित होते.