सेन्सेक्सची जबरदस्त उसळी : ३९ हजारांचा टप्पा पार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शेअरबाजारात नव्या आर्थिक नववर्षाच्या सुरुवातीलाच जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला असून सेन्सेक्सने ३९ हजारांची ऐतिहासिक उसळी घेतली आहे. निर्देशांकाने घेतलेली ही झेप बघता मुंबई शेअर बाजार ४० हजारांचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात झाली त्याच वेळी निर्देशांक १८५.९७ अंकांनी वधारून ३८८५८.८८ इतका झाला. तर निफ्टीही ४१.३ अंकांची उसळी पाहायला मिळाली.\

११६६५.२० वर निफ्टीच्या कामकाजाला सुरुवात झाली. आर्थिक विकासाला चालना मिळावी या करता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात हा उत्साह पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सुधारली आहे. त्याचाही परिणाम पाहायला मिळत आहे. आज सकाळी १०.१८ च्या सुमारास ३३५ अंकांची झेप घेत निर्देशांक ३९ हजारावर जाऊन पोहोचला. तर निफ्टीही ११७०० अंकांवर पोहोचला. याआधी ९ ऑगस्ट २०१८ रोजी निर्देशांकाने पहिल्यांदा ३८ हजारांचा टप्पा गाठला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram