Breaking News

 

 

वर्धापनदिनानिमित्त आज बाचूळकर फर्निचरतर्फे खरेदीवर तब्बल ४० टक्के सूट 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ शिरगांव (ता. करवीर) येथील बाचूळकर फर्निचर मॉल  आज (सोमवार) आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्त आज ग्राहकांसाठी फर्निचर खरेदीवर तब्बल ४० टक्के सूट देण्यात आली आहे, अशी माहिती नितीन बाचूळकर यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिली. ही विशेष ऑफर फक्त आज (१ एप्रिल) एकाच दिवसासाठीच लागू आहे.

एक वर्षापूर्वी गोकुळ शिरगांव येथे बाचूळकर फर्निचर मॉल  सुरु झाले.  फर्निचरचा उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत यामुळे अल्पावधीतच बाचूळकर फर्निचर ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. ग्राहकांना सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी बाचूळकर एक उत्तम पर्याय ठरला आहे. वर्षभर आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या बाचूळकर फर्निचरतर्फे आज पहिल्या वर्धापनदिनानिमित्त खरेदीवर ४० टक्के थेट सूट देण्यात आली आहे. आजच्या दिवशी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनाही ही ऑफर घेता येईल. या ऑफरचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन नितीन बाचूळकर यांनी केले आहे.  (संपर्क -९८९०३७९४४४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा