संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकचे ‘बी प्लस’ मानांकन…

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक समितीकडून बी प्लस मानांकन प्राप्त झाले. दि. २६ आणि २७ रोजी बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) समितीकडून महाविद्यालयास भेट देऊन पाहणी करण्यात आली होती.

दोन दिवस चाललेल्या या भेटी दरम्यान समितीने महाविद्यालयातील सर्व विभागाचे शैक्षणिक उपक्रम, भौतिक सोयी-सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली होती. संजीवन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालयास पहिल्यांदाच नॅक समितीचे मानांकन मिळाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे.

नॅक समितीचे प्रमुख डॉ. रवीप्रकाश दुबे, समन्वयक डॉ. धीरेंद्र सिंघल, सदस्य डॉ.जी.देवराज्ञे यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली. कॉलेजचे प्राचार्य डॉ.मोहन बी.वनरोट्टी यांनी यावेळी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती समितीला दिली. संजीवन शिक्षण संस्थेचे चेअरमन पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले यांनी नॅक समितीचे स्वागत केले.

यावेळी नॅकचे समन्वयक डॉ. सिद्धाप्पा बेकीनाळ, प्रा.आर.एस.कुलकर्णी, प्रा.जी.सी.कोळी, आय.क्यु.एस.सी.एनचार्ज डॉ.एस.टी.जाधव, प्रा.निशांत थरकार,प्रा.अजित काटकर,बी.व्ही.कुंभार, दिपक पाटील, कृष्णात शिंदे, सर्व विभागाचे विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram