Breaking News

 

 

‘देसी गर्ल’ घटस्फोटाच्या तयारीत..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉलीवूडची अभिनेत्री, देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनस यांनी डिसेंबरमध्ये विवाह केला. ही जोडी सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असते. मात्र त्यांचा अवघा चार महिन्यांचा संसार आता मोडण्याच्या तयारीत आहे. दोघेही घटस्फोटाच्या तयारीत असल्याचा दावा ओके या आंतरराष्ट्रीय मासिकाने केला आहे. तर या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या निकटवर्तीयानी दिले आहे. 

ओके मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा रागीट स्वभाव आणि निकचे आयुष्यावर नियंत्रण ठेवणं त्याला पसंत नाही. निकसोबत जोनस कुटुंबीयांनाही प्रियांकाचं वागणं आता खटकायला लागलंय. जोनस कुंटुंबाला प्रियांका समंजस महिला वाटली होती. मात्र प्रियांकाचा वास्तवात व्यवहार हा २१ वयाच्या मुलीसारख्या असल्याचे कुटुंबाने म्हटले आहे. जर निक आणि प्रियांकामध्ये घटस्फोट झाला तर संपत्तीचा मोठा विवाद उद्भवण्याची शक्यताही या मॅगझिनने वर्तवली आहे. परंतु, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण प्रियांकाच्या टीमनं दिलं आहे. तसेच ओके मॅगझिन निक आणि प्रियांकाबद्दल अनेकदा खोट्या बातम्या पसवरत असल्याचेही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा