Breaking News

 

 

पोंबरेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे केले मतदानाचे आवाहन…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) : विद्या मंदिर, पोंबरे (ता.पन्हाळा) या शाळेमध्ये आज (शनिवार) मतदार जागृती अभियान करण्यात आले.  शाळेतील मुलांनी गावातील चौका-चौकात जाऊन पथनाट्य आणि प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे सर्वांनी मतदान करावे आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असा संदेश दिला.

त्याच बरोबर मतदार हे नेत्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. त्यामुळे नागरीकांनी योग्य त्या उमेदवाराला मत देऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच मतदानाला सर्वांनी जावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले, सहा-शिक्षिका ज्योती डोईफोडे, सुहास पाटील, सरपंच गणपती पाटील, पोलीस पाटील भीमराव कांबळे, दत्ता पाटील यांच्यासहीत ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे