कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  येथील सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालयात शिरोळ तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बैठक झाली. बैठकीमध्ये शिरोळ तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी एस. डी. चौगुले (जयसिंगपूर महाविद्यालय) यांची, तर उपाध्यक्षपदी ए. ए. मौलवी (डॉ. अल्लामा इकबाल हायस्कूल कुरुंदवाड) यांची निवड झाली.

सचिव- विकास पाटील (अब्दुल लाट), सहसचिव- एस. ए. मुजावर (घोडावत कन्या महाविद्यालय)  खजिनदार- दीपक खुरपे (दत्तवाड), सदस्य : अरुण जगदाळे (कवठेगुलंद), एस. जी. लोंढे, पाटील, एम. झेड. मगदूम, के. एस. सावगावे  महिला प्रतिनिधी : यू. एस. पाटील, एस. एफ. पैलवान, जिल्हा प्रतिनिधी : अनिल पाटील, एस. आर. सावगावे यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.

कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर झालेल्या मेळाव्यामध्ये राज्यात पहिल्यांदाच ‘कला शाखा बचाव’ या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाचे विविध प्रश्न शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून मांडून ते तत्परतेने कसे सोडवावेत, याविषयी मार्गदर्शनही झाले. या निवडीसाठी खास करून ‘कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दुर्गी,  सचिव मोरे, सहसचिव मडिवाळ, कोशाध्यक्ष होडगे हे उपस्थित होते.  प्रास्ताविक आर. एन. कदम यांनी केले. आर. ए. साठे यांनी आभार मानले. यावेळी  १०० शिक्षक उपस्थित होते. बैठकीचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष संदीप सावगावे यांनी केले होते.