कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील महासैनिक दरबार हॉलकरिता कंत्राटी पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज कागदपत्रांसह १२ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

विजतंत्री- १३ हजार ५०० रुपये एकत्रित मानधनावर एक पद (विद्युत शाखेतील आयटीआय कोर्स पास असावा), सफाई कर्मचारी एक व प्लंबर एक (पुरुष) १३ हजार मानधनावर भरावयाचे असून, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. सर्व पदे माजी सैनिक संवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. प्राप्त अर्जांची छाननी करुन प्राप्त उमेदवारांची मुलाखत बुधवार १७ ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी १० वाजता घेण्यात येईल. उमेदवार निवडीचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.