मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळाचा २२ वर्धापन दिन चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम अशा बांद्राई धनगरवाड्यावर साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूरच्या माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे होत्या.

दीप प्रज्वलन मंडळाच्या अध्यक्षा आशा माने, उपाध्यक्ष शकुंतला गावडे, अरुणा गावडे यांच्या हस्ते झाले. अहिल्यादेवी महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शशिकला सरगर म्हणाल्या, अहिल्यादेवी महिला मंडळ हे गेली २२ वर्षे सामाजिक कार्य करत आहे. महिला, मुलींसाठी आरोग्य शिबिर, गरजूंना मदतीचे वाटप, असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे म्हणाले, धनगरवाड्यावरील मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये म्हणून ‘एक वही’ सामाजिक उपक्रम लोकसहभागातून सुरू केला आहे.

कार्यक्रमास अश्विनी वाघमोडे, संगीता जुगळे, संध्या नागण्णावर, नीलिमा हजारे प्रा. नागरत्ना ग्याल, प्रा. शशिकला सरगर, सेक्रेटरी माधवी अर्जुन राजगे, सुनीता सलगर, लता शेळके, सिंधू घागरे, शिवानी सलगर, उपाध्यक्ष शोभा हजारे, शैलजा ब़न्ने, सुवर्णा लवटे, नागरत्ना ग्याल, रागिणी पुजारी उपस्थित होते.

प्रास्ताविक सचिन पिटुकले यांनी, तर नियोजन अंगणवाडी सेविका व यशवंत क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षा सविता डोईफोडे यांनी केले. सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल पाटील, मुख्याध्यापक सुभाष गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विठ्ठल डोईफोडे, आप्पाजी डोईफोडे, पिंटू डोईफोडे, रामू लांबोर, विठ्ठल लांबोर, रामू डोईफोडे, नागोबा लांबोर, जनाबाई लांबोर इत्यादी उपस्थित होते.

धनगरवाड्यावरील अंगणवाडीपासून ते १२ वीपर्यंतच्या ४४ मुलांना दप्तर, रेनकोट, छत्री, स्वेटर, ट्रॅकसूट व वह्या, कंपास, रंग पेटी इत्यादी शैक्षणिक साहित्य अहिल्यादेवी महिला मंडळाच्या वतीने देण्यात आले. शिवाय लाडू-चिवड्याचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक सुभाष गवस यांनी आभार मानले.