रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी येथील व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित बालमंदिरमध्ये नागपंचमीचा सण आदल्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेत पारंपारिक पद्धतीने नागाची पूजा करण्यात आली. या निमित्त ८ वी १० वीच्या विद्यार्थिनींनी हातावर मेहंदी काढली होती. शाळेत साजऱ्या झालेल्या नागपंचमी सणाचा मुलांनी आनंद लुटला. आपल्या विविध सणांची माहिती व्हावी आणि भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी शाळेत घेतलेल्या उपक्रमाचे पालकांनी सर्व शिक्षक, शिक्षिका व व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी परिवाराचे कौतुक केले.