पाकिस्तानच्या क्रिकेटवर इम्रान खान नाराज…

कराची (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या पुढे असणाऱ्या अडचणी दिवसांगणिक वाढत आहेत. त्यातच इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची सुरु असणारी सुरु आहे. यावर इम्रान खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि अन्य सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. 

यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाच्या निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडत विश्वचषकासाठी पाकिस्तानचा सर्वोत्तम संघ पाठवण्यात यावा, अशी बाब समोर ठेवली आहे. सहा महत्त्वाच्या खेळाडूंना सध्या सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न निवडता त्यांना विश्रांती देण्यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न अनेक स्तरांतून उपस्थित करण्यात येत आहे.

यामध्ये कर्णधार सरफराज अहमद, फखर जमान, हसन अली, बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी या खेळाडूंना सध्या विश्रांती देण्यात आली आहे. त्याशिवाय निवडकर्त्यांनी ऑलराऊंडर फहीम अशरफलाही दुसऱ्या सामन्यानंतर संघातून वगळलं गेलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही एकंदर भूमिका आणि भवितव्यात संघाची कामगिरी या मुद्द्यांमुळे इम्रान खान चिंताग्रस्त असल्याचं कळत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram