टोप (प्रतिनिधी) :  दहशतवादी संघटनाशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून एनआयएने काल (रविवार) मध्यरात्रीच्या सुमारास हुपरी येथे छापा टाकला. यामध्ये इरशाद आणि अलताफ शेख सख्या भावांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हुपरी येथील अंबाईनगरमध्ये राहणाऱ्या या सख्ख्या भावांना दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याच्या कारणावरून एनआयएच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून हुपरीतील संतप्त जमावाने त्यातील संशयित इरशाद याच्या लब्ब्याक इमदाद फाउंडेशनच्या कार्यालयाची तोडफोड केली. घटनास्थळी स.पो.नि. पंकज गिरी यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.