कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेकायदेशीर घातक शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील एकाला कागल येथील आय.बी.पी.पेट्रोल पंपानजीक पी.यू सी.सेंटर परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले.

विजयसिंग तुफानसिंग कलानी (वय २२ रा. आसरानगर ता. निपाणी जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २३ धारदार तलवारी आणि दुचाकी असा ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार  खंडेराव कोळी, चंदू नन्नवरे, कुमार पोतदार, प्रदीप पवार, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली.