‘रंगीली’ गर्लने पकडला काँग्रेसचा ‘हात…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी मी राजकारणात येत आहे, असे सांगत ‘रंगीली’ गर्ल उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसचा ‘हात’ पकडला. तिच्या प्रवेशावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, प्रवक्ते रणदीप सूरजेवाला, काँग्रेस नेते संजय निरुपम उपस्थित होते.

उर्मिला मातोंडकर हिने प्रवेशानंतर सांगितले की, मी राहुल गांधी यांचे आभार मानते. माझ्यासाठी हा दिवस खूप मोठा दिवस आहे. माझ्या कुटुंबाची वाटचाल ही गांधीजी आणि नेहरूंच्या विचारांवर राहिली आहे. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले. संविधान दिले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. मात्र आज अशी परिस्थिती आली आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी सक्रिय राजकारणात उतरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram