‘दिलबहार’वर  बहिष्कार : रेफ्री संघटनेचा निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या हुल्लडबाजी, दगडफेक आणि रेफ्री कार्यालयाच्या मोडतोडीच्या पार्श्वभूमीवर यापुढे दिलबहार संघाच्या सामन्यावेळी पंचगिरी न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर रेफ्री असोसिएशनच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान या अंतिम साम्यानंतर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ चा खेळाडू शशांक माने आणि ८ ते १० समर्थकांनी पंचांच्या चेंजिग रूममध्ये जबरदस्ती घुसून सहपंच अजिंक्य गुजर यांना शिवीगाळ आणि गंभीर मारहाण केली. व रेफ्री कार्यालयाचे प्रचंड नुकसान केले. यानंतर संतप्त जमावाने मैदानावार हुल्लडबाजी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या गाडीवरील दगडफेक, या सर्व घटनांचा रेफ्री असोसिएशन ने निषेध केला. व शशांक माने या खेळाडूवर कडक कारवाई करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.

दिलबहारच्या एका जबाबदार व्यक्तीने पंचांमुळे सामन्यात पराभव होण्याची नामुष्की येते असा आरोप एका दैनिकातून २५ मार्चला केला होता. जर संघाचा पराभव पंचांमुळे होत असेल तर दिलबहार संघाच्या कोणत्याही सामन्यास रेफ्री असोसिएशनचे पंच उपलब्ध राहणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram