गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या गटासह पंचायत समिती गणांचे आरक्षण आज घोषित करण्यात आले. गडहिंग्लजमधील पंचायत समितीच्या दहा गणांसाठीची आरक्षण सोडत नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी काढण्यात आली.

२००२ पासूनच्या चार वेळच्या आरक्षणाचा चक्राकार विचार होऊन प्राधान्य क्रमानुसार नेसरी गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी हसूरचंपू, आणि सर्वसाधारण महिलेसाठी महागावची चिठ्ठी निघाली.

बसर्गे, हलकर्णी, महागाव, गिजवणे हे सर्वसाधारण स्त्रीसाठी, तर हसूरचंपू गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित झाले. नूल, भडगाव आणि हडलगे गण खुले राहिले, तर कडगाव नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे यांच्या उपस्थितीत हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. स्वरा महेश दळवी या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील तिसरीच्या विद्यार्थिनीने सर्वसाधारण महिलेच्या आरक्षणाची एकमेव चिठ्ठी काढली.