पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा  गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची आरक्षण सोडत कार्यक्रम आज (गुरुवार) संपन्न झाला. ही सोडत प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळ्याच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

यावेळी आगामी निवडणुकीतील मागास आरक्षण सोडतीची चिठ्ठी  पन्हाळा विद्यामंदिरची विद्यार्थिनींची जिया आत्तर आणि वैष्णवी थोरातच्या हस्ते काढण्यात आली. प्रभाग क्रमांक तीनचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता एकूण १० प्रभाग असून २० नगरसेवक असणार आहेत. २० पैकी १० नगरसेवक महिला असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी १ सर्वसाधारण गटात ७ जागा आरक्षित राहणार आहेत. तर अनुसूचित जाती महिलासाठी २ जागा आरक्षित असणार आहेत. खुल्या गटात ५ महिला नगरसेवकपदावर विराजमान होणार आहेत.

यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ अनुसूचित महिला, १ ब सर्वसाधारण आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक २ अ ना. मा प्रवर्ग, २ ब सर्वसाधारण महिला आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक ३ अ ना.मा प्रवर्ग, ३ ब सर्वसाधारण महिला असणार आहे. प्रभाग क्रमांक ४ अ सर्वसाधारण महिला, ४ ब सर्वसाधारण आरक्षण आहे. प्रभाग क्रमांक ५ अ  ना. मा. प्रवर्ग महिला, ५ ब सर्वसाधारण आरक्षण आहे.

प्रभाग क्रमांक ६ अ ना. मा. प्रवर्ग महिला, ६ ब सर्वसाधारण आरक्षण आहे. प्रभाग क्रमांक ७ अ अनुसूचित जाती, ७ ब सर्वसाधारण महिला आरक्षण राहणार आहे. प्रभाग क्रमांक ८ अ अनुसूचित जाती महिला, ८ ब सर्वसाधारण आहे. प्रभाग क्रमांक ९ अ सर्वसाधारण महिला, ९ ब सर्वसाधारण आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक १० अ ना. मा. प्रवर्ग महिला, १० ब सर्वसाधारण आरक्षण राहणार आहे.

यावेळी अमित माने, अंशुमन गायकवाड, मुकुल चव्हाण, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी नगरसेवक रवींद्र धडेल, मंदार नायकवडी, सुभाष गवळी, रमेश स्वामी, राहुल भोसले यांच्यासहीत आदी उपस्थित होते.