लंडन : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना आजपासून (२८ जुलै) सुरुवात होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे १०८ पुरुष आणि १०७ महिला खेळाडू विविध अशा १५ खेळांमध्ये सहभागी होतील.

भारतीय संघाचे नेतृत्त्व ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह करणार आहेत. हे दोघेही कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह ७२ देशांतील ५ हजार ५४ खेळाडू यात सहभागी होतील. ११ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत २० विविध खेळांच्या २८० स्पर्धा खेळवल्या जातील. स्पर्धेतील सर्व सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी पिक्चर्स नेटवर्कवर केले जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक २०२२ चे थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांवर होणार आहे