लज्जास्पद : फुटबॉल सामन्यानंतर छ. शाहू महाराजांच्या गाडीवर दगडफेक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील छ. शाहू स्टेडियमवर झालेल्या चंद्रकांत चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यानंतर हुल्लडबाजांंनी तुफान दगडफेक केली. दिलबहार विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ सामन्यादरम्यान निकालावरून झालेल्या वादावादीत छ. शाहू महाराजांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यादरम्यान शाहू महाराजांच्या ताफ्यातील ८ गाडींवर दगडफेक करण्यात आली.  त्याचप्रमाणे मॅच रेफ्रीचे कार्यालय देखील दगडफेकीमध्ये फोडण्यात आले.

पाटाकडील तालीम मंडळाने सामना २-१ असा जिंकला. मात्र त्यानंतर सामन्याच्या निकालावरून मैदानातील हुल्लडबाजांनी गोंधळ घालीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये मैदानाबाहेर आणि मैदानामध्ये दोन्हीकडील समर्थकांनी एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. व दगडफेक करण्यास सुरुवात केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram