कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या अवलिया मोहरम उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी प्रदीप सुतार यांची, तर उपाध्यक्षपदी इम्रान बागवान यांची निवड करण्यात आली आहे. या कमिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी : सेक्रेटरी- अक्षय पाटील, खजानिस- आशीष पडवळ, सल्लागार- अमर पंडत, महेश कदम, बादल बुचडे, अजिज पठाण, संदीप पोवार, निखिल घोटणे, मुबीन नाईक, दिलीप खामकर, सचिन पंडत, सचिन कांबळे, उद्धव माने, फारूक इंगळीकर, विनायक कांबळे, रवी घुले.

यावेळी भास्कर पाटील, राजस्तरीय कलरत्न पुरस्कार विजेते भालचंद्र कदम, दशरथ भोसले, प्रशांत जगदाळे, धनंजय नामजोशी, मोहन जोशी (पुजारी) या सामाजिक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फारूक इंगळीकर, सातापा गवळी, शंभू बोंद्रे, सुशांत निकम, ओंकार शिंदे, शानू गोलंदाज व पदाधिकारी उपस्थित होते.