राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : गडहिंग्लजच्या युनायटेड स्कूलला विजेतेपद

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील युनायटेड  स्कूलच्या १६  वर्षाखालील संघाने डेरवण (ता. चिपळूण) येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. संघाला चषक आणि  रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.  १८  वर्षे गटात युनायटेड स्कूलचा संघ उपविजेतेपदासह ८ हजार रुपयांच्या पारितोषिकाचा  मानकरी ठरला. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट (एसव्हीजेसिटी) मार्फत या यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण १६ संघानी सहभाग घेतला होता.

सोळा वर्षाखालील अंतिम सामन्यात युनायटेड स्कूलने विद्या विकासनी वसई-विरार  (मुंबई) संघाचा ३-० असा पराभव करून विजेतेपद मिळविले. अभिषेक पवार याने दोन तर कुपिंदर पवारने एक गोल केला. उपांत्य फेरीत युनायटेड स्कूलने सेंट अँड्रूज स्कूल बांद्राचा एक गोलने तर  उपांत्यपूर्व फेरीत युनिव्हर्सल स्कूलचा ३-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

अठरा वर्षांखालील गटातील अंतिम फुटबॉल सामन्यात युनायटेड फुटबॉल स्कूलला पुण्याच्या पुणेरी वॉरियस॑ संघाकडून अंतिम सामन्यात  टायब्रेकरवर ४-२ असा पराभव स्वीकारावा लागला. निर्धारित वेळेत सामना ०-०  असा बरोबरीत होता. उपांत्य फेरीत युनायटेड स्कूलने स्थानिक चिपळूणचा ३-० असा पराभव केला. विजेत्या आणि उपविजेत्या संघातील खेळाडूंचा युनायटेडचे अध्यक्ष संभाजी शिवारे आणि उपाध्यक्ष अरविंद यांनी अभिनंदन केले.

सोळा वर्षाखालील विजेतेपद पटकावलेला संघ असा : कुपिंदर पवार, अभिषेक पवार, गोपी बनगे, अमर गवळी, नुमान मुल्ला, आदित्य रेंदाळे, आदित्य संभाजी, किरण राठोड, रोहित आडावकर, सोमनाथ गोंधळी ,श्रवण जाधव, मुजम्मिल आत्तार, अमन मकानदार, धीरज कानडे, साई पोतदार, प्रणव गवस,  श्रवण पाटील, कुलदीप पाटील, अरबाझ वटमुरे, प्रशिक्षक – दीपक कुपनावर, सहाय्यक प्रशिक्षक – यासिन नदाफ.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram