महिला आयलीग फुटबॉल : ‘एफ. सी. कोल्हापूर’ची ‘पिफा कुलाबा’वर एकतर्फी मात

मुंबई (प्रतिनिधी):- येथील कुफरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलिग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघाने पिफा कुलाबा, मुंबई संघावर २-० अशी एकतर्फी मात केली.  

पूर्वार्धापासूनच एफ. सी. च्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सामन्यावर पक्कड घेतली. नियोजनबध्द चढाया करत एकापाठोपाठ एक गोल नोंदवल्या. बलाढ्य पिफा कुलाबा संघास प्रतिकाराची संधी ही न देता दोन विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवत स्पर्धेतील आपले स्थान भक्कम केले. एफ. सी. च्या मृणाल खोत व आदिका भोसले यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. विजेता फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघ व फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया मुंबई संघ यांच्यामध्ये २४ मार्च रोजी सामना होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram