चंद्रकांत चषक फुटबॉल : ‘पीटीएम’कडून संयुक्त जुना बुधवार संघाचा धुव्वा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज (गुरुवार) झालेल्या सामन्यात ‘पीटीएम’ने संयुक्त जुना बुधवार संघाचा ४ –० ने धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे.

पहिल्या हाफमध्ये पीटीएमने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात केली. ऋषिकेश मेथे पाटीलने १५ व्या आणि ३९ व्या मिनिटाला गोल करून सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या हाफमध्ये सामना काहीसा संथ खेळ सुरू असतानाच ऋषीकेश मेथे पाटीलने  तिसरा गोल नोंदवत सामन्यात पुन्हा रंगत आणली.  मि. ऋषिकेशने डेव्हिड इथोच्या पासवर अगदी सहजरित्या वैयक्तीक आणि संघासाठी चौथा गोल करीत संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला.

किरण कावणेकर  – लढवय्या

ऋषिकेश मेथे पाटील  – सामनावीर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram