गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये नव्याने बांधकाम होणाऱ्या उपनिबंधक कार्यालय इमारतीमुळे नागरिकांचे त्रास वाचतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाकडे दस्त करण्यासाठी येणाऱ्यांना आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले.

गडहिंग्लजमध्ये उपनिबंधक कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातून सुसज्ज व अद्ययावत उपनिबंधक कार्यालय इमारतीसाठी ९८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

मुश्रीफ म्हणाले, या कार्यालयाला अनेक वर्षापासून पुरेशी इमारत नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासाठीही सुसज्ज इमारत व्हावी व सर्वच शासकीय कार्यालय तिथे न्यावीत, हा माझा प्रयत्न होता. त्यासाठी जनावरांच्या दवाखान्याजवळ जागाही बघितलेली आहे. लवकरच पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशनची इमारत मंजूर करू.

यावेळी सतीश पाटील-गिजवणेकर, किरणअण्णा कदम, उदयराव जोशी, महेश सलवादे, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई, सिद्धार्थ बन्ने, वसंतराव यमगेकर, शर्मिली पोतदार, रेश्मा कांबळे, शारदा आजरी, दीपक कुराडे, बाळासाहेब मिणचेकर, नेताजी पाटील, बंटी पाटील, संदीप कागवाडे, जावेद बुडेखान, प्रकाश पाटील, प्रकाश कांबळे, सुनील स्वामी, प्रसाद दड्डीकर, अशोक शिंदे, राकेश सासने, भरत शिंदे, अमर मांगले आदी प्रमुख उपस्थित होते.