अभिमानास्पद : पिता-कन्या एकाच दिवशी घेणार वकिलीची पदवी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याला वयाचं बंधन नसत, या उक्तीचा प्रत्यय  ५७ वर्षीय श्रीकांत वारके यांनी दिला आहे. ते उद्या आपली २६ वर्षीय कन्या प्रणोतीसोबत शहाजी लॉ कॉलेजमध्ये वकिलीची पदवी घेणार आहेत. या पिता-कन्येच्या अनोख्या यशाची शहरात चर्चा आहे.

श्रीकांत यांचे १९८३ मध्ये बी.कॉमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर प्रापंचिक अडचणींंमुळे सांसारिक जीवनामुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. त्याचा मुलीने २०१५ मध्ये वकिलीचे शिक्षण घेणार असल्याचे वडिलांना सांगितले. यानंतर मुलीच्या या निर्णयाने प्रभावित होऊन श्रीकांत यांनीही वकिलीला प्रवेश घेतला. मागील वर्षी ते एलएलबी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले. आता या वर्षी श्रीकांत वारके आणि त्यांची कन्या प्रणोती आपली वकिलीची पदवी घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे या दोघांनी आपली सनद एकाच वेळी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram