कुंभोज (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर, सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूतीने करावयाची आहे.

निर्धारित केलेल्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रम राबवायचा आहे. कुंभोज गावातील २६०९ घरांवर तसेच सर्व शासकीय कार्यालय, शाळा इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात यावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी नागरिकांना केले आहे. तिरंगा ध्वज अल्पदरात ग्रामपंचायत कुंभोज येथे उपलब्ध करून दिला जाणार आहे.