कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि संजय घोडावत या विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही विद्यापीठांना परस्परांच्या सुविधा, उपकरणे यांचा अध्ययन आणि संशोधनासाठी वापर करण्यात येईल. प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी परस्परांच्या विद्यापीठांना भेटी देऊन संशोधन करणार आहेत.

या करारामुळे आंतरराष्ट्रीय सेमिनार, कार्यशाळा, संमेलने यांचे आयोजन संयुक्तपणे करता येईल. त्याचबरोबर  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांकडे संयुक्तपणे प्रोजेक्टसाठी आर्थिक सहाय्य मागता येईल. या करारामुळे दोन्ही विद्यापीठांना एकत्रित काम करण्याची संधी मिळेल. या कराराची मुदत पाच वर्षे आहे.

या करारावर डी. वाय. पी. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, तर घोडावत विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. अरुण पाटील व कुलसचिव डॉ. विवेक कायंडे यांनी सह्या केल्या. हा सामंजस्य करार करण्यासाठी डॉ. सी. डी. लोखंडे आणि डॉ. एस. एम. पवार यांनी प्रयत्न केले. करार करतेवेळी डॉ. एस. एम. पवार, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. आर. एस. पाटील उपस्थित होते.