बळीराजा पक्षातर्फे ‘कोल्हापूर’मधून किसन काटकर, तर ‘हातकणंगले’तून जे. बी. पाटील…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील रोजगार, शिक्षण, आरोग्य शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी बळीराजा पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्यात येणार आहे. पक्षातर्फे कोल्हापूर मतदारसंघातून किसन काटकर तर ‘हातकणंगले’मधून जे. बी. पाटील (काका) निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती पक्षाचे संस्थापक दिगंबर लोहार यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.  

लोहार म्हणाले की, सध्याचे पक्ष हे दलबदलू असून त्यांनी कोणतेही विकासाचे काम केले नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा खंडपीठाचा असो किवा रस्ते विकासाचा सगळे प्रश्न लोंबकळत ठेवले आहे.२०१४ पूर्वी जनतेला या सरकारने मोठी आश्वासने दिली त्याचे पालन त्यांना करता आले नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी बळीराजा पार्टी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आली आहे. कोल्हापूर मतदारसंघातून किसन काटकर तर हातकणंगलेमधून बी.जी. (काका) पाटील हे निवडणूक लढवतील..

या वेळी बळीराजा पक्षातर्फे महाराष्ट्रात १६ उमेदवारांची यादी आणि पक्षाचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. जाहीरनाम्यात रोजगार, शेती यावर पक्षाने अधिक भर दिला आहे. या वेळी संपर्कप्रमुख शिवाजी माळकर,  कोकण विभाग अध्यक्ष यशवंत महाडिक, संस्थापक महासचिव दिगंबर लोहार, शहराध्यक्ष किसन काटकर, दत्तात्रय सुतार पी. ए. कुंभार, भैया वाघमारे आदि कार्यकर्ते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram