मुंबई (प्रातिनिधी) : माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केले आहेत. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. शिवतारे हे पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारेंच्या हकालपट्टीनंतर पुरंदरमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.