नंदगावच्या विक्रम कुराडेची आशियाई ग्रीकोरोमन स्पर्धेसाठी निवड….

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  दिल्ली येथे आज (रविवार)  झालेल्या आशियाई कुस्ती  निवड चाचणीमध्ये  नंदगाव (ता.करवीर) इथल्या विक्रम कुराडेने  आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आशियाई ग्रीकोरोमन स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.

आज झालेल्या सामन्यात ६३ किलो गटात ग्रीकोरोमन प्रकारात प्रथम फेरीत आर्मीच्या तैबांग याला  ५-१ ने पराभव करून सेमिफायनलमध्ये प्रवेश केला. तसेच विक्रमने रणजीत (हरियाणा) ५-३ गुण फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. विक्रमने पश्चिम बंगालच्या सोनूवर १२-३ ने मात करत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. ही स्पर्धा चीन येथे २३ ते २८ एप्रिल रोजी होणार आहे. विक्रम सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे येथे अर्जुन अवॉर्ड विजेते काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram