गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (गुरुवारी) चौथ्या दिवशी तब्बल १०९ अर्ज दाखल झाले. उद्या शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्याही अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

आजपर्यंत दाखल अर्जांची संख्या १८५ वर पोहोचली असून, त्यापैकी १५ अर्ज दुबार आहेत. गटनिहाय विचार केल्यास कडगाव कौलगे गटात २४, गडहिंग्लज हनिमनाळ गटात २४, भडगाव मुगळी गटात १८, नूल नरेवाडी गटात २४, महागाव हरळी गटात २६, संस्था गटात ८, अनुसूचित जाती गटात ९, महिला गटात २२, इतर मागास गटात १४ आणि विशेष मागास गटात १६ असे अर्ज दाखल झाले आहेत.