कोल्हापूर (प्रतिनिधी) : यळगूड येथील सारथी फाऊंडेशनच्या वतीने कुमार आणि कन्या विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त ‘माझा घरचा अभ्यास’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना घरी करण्यासाठी दैनंदिन अभ्यास दिला जातो. हा अभ्यास एकाच पुस्तिकेत लिहिता यावा, यासाठी वाटप केलेल्या ‘माझा घरचा अभ्यास’ पुस्तिकेचा लाभ सुमारे ५०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना होणार असल्याचे सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष परीस बडवे यांनी सांगितले. यावेळी फाऊंडेशनचे मोहनराव बडवे, मोहिनी बडवे, सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.