पन्हाळा (प्रतिनिधी) : शिवचरित्र लाल कापडात गुंडाळून न ठेवता युवा पिढीच्या लाल रक्तात घुसले पाहिजे. म्हणजे घराघरात शिवा काशीदसारखे योद्धे जन्माला येतील. शिवाजी महाराज आणि शिवा काशीद यांचे गुरू-शिष्याचे नाते व स्वराज्यासाठी शिवा काशीद यांचे बलिदान हा इतिहास अजरामर असल्याचे प्रतिपादन प्रा. पवनकुमार पाटील यांनी केले.

पन्हाळा येथे शिवा काशीद यांच्या ३६२ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव काशीद होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. आर. टिपुगडे, विभागीय अध्यक्ष मारुतीराव टिपुगडे, जिल्हा अध्यक्ष सायजी झुंझार, मनोहर झेंडे, रविकिरण इंगवले, रवींद्र धडेल आदी मान्यवर उपस्थित होते.

नेबापूर येथील नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीला माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सरपंच प्रतिभाताई पाटील, देवस्थान कमिटीचे सचिन शिवराज नायकवडी यांच्या हस्ते अभिषेक करून अभिवादन करण्यात आले. चार दरवाजा येथील शिवा काशीद पुतळा व बाजीप्रभू देशपांडे पुतळा आणि शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजर्षी शाहू पुरस्कारप्राप्त सचिन जाधव (सोळंकूर), शिक्षक बँकेचे नूतन संचालक रामदास झेंडे (पुनाळ), दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवलेला वेदांत झेंडे (जयसिंगपूर) आणि शिवा काशीद यांचे वंशज डॉ. अवधूत रामचंद्र काशीद यांनी बीएचएमएस परीक्षेत डॉक्टर पदवी मिळवल्याबद्दल, जिल्हा अध्यक्ष सायजी झुंझार, संवर्धन कमिटी अध्यक्ष संतोष चव्हाण, माजी उपाध्यक्ष विश्वास गंगाधर यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी सुनील काशीद, दीपा काशीद, अनिल संकपाळ, शहर अध्यक्ष विवेक सूर्यवंशी, श्रीकांत झेंडे, पत्रकार रामचंद्र काशीद, रामचंद्र संकपाळ, सुनील इंगळे, भीमराव काशीद, दगडू काशीद, वसंतराव रोखडे, दिनकर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात बामणे, पांडुरंग भोसले, कृष्णात टिपुगडे, दीपक माने, सदाशिव सूर्यवंशी, मारुती संकपाळ, विशांत मोहिते, तानाजी फडतारे, पोलीस पाटील संदीप काशीद, किरण बुचडे आदी उपस्थित होते.