गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी विविध गटातून एकूण २५ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी दोन दुबार अर्ज आहेत. सोमवारी दाखल झालेच्या २० अर्जासह आजपर्यंत दाखल झालेले ४५ अर्ज आहेत.

यामध्ये कडगाव-कौलगे गटात ८, गडहिंग्लज-हनिमनाळ गटात ५, भडगाव-मुगळी गटात ६, नूल नरेवाडी गटात ४, महागाव हरळी गटात ६, संस्था गटात २, अनुसूचित जाती गटात ४, महिला गटात ५, इतर मागास गटात ३ आणि विशेष मागास प्रवर्ग गटात २ असे अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येथील सहायक उपनिबंधक कार्यालयात सुरु असून, एका टेबलवर अर्ज विक्री, तर अर्ज स्वीकारण्यासाठी गटनिहाय स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोल्हापूरचे उपनिबंधक प्रकाश जगताप, तर गडहिंग्लजचे सहायक निबंधक अमित गराडे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.