कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर परिसरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी-जास्त होता. थोडा वेळ उघडीप होती. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु असून, मंगळवारी सायंकाळी ७ वा. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी ३४ फूट ५ इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ५३ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात १३२.३५ दलघमी पाणीसाठा असून, या धरणातून १३५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे धरण ५५.८९ टक्के भरले आहे.

सध्या जिल्ह्यातील इतर धरणांमधून पुढीलप्रमाणे विसर्ग चालू आहे. तुळशी प्रकल्प- आजचा पाणीसाठा- १.८७ टी.एम.सी. (५२.१२ टक्के) विसर्ग-० क्युसेस, वारणा प्रकल्प- आजचा पाणीसाठा -१८.८६ टी.एम.सी. (५४.८३ टक्के) विसर्ग- ८०६ क्युसेस, (विद्युत), दुधगंगा प्रकल्प- आजचा पाणीसाठा- ११.६४ टी.एम.सी. (४५.८३ टक्के) विसर्ग- ७०० क्युसेस, कासारी प्रकल्प- आजचा पाणीसाठा- १.८४ टी.एम.सी. (६६.१७ टक्के) विसर्ग- २५० क्युसेस

कडवी प्रकल्प- आजचा पाणीसाठा १.४५ टी.एम.सी. (५७.७६ टक्के) विसर्ग-१४० क्युसेस, (विद्युत), कुंभी प्रकल्प- पाणीसाठा- १.५४ टी.एम.सी. (५६.६६ टक्के) विसर्ग- ३०० क्युसेस, पाटगाव प्रकल्प- पाणीसाठा- २.०४ टी.एम.सी. (५४.८७ टक्के) विसर्ग- ०० क्युसेस (विद्युत), चिकोत्रा प्रकल्प- पाणीसाठा- o.८४ टी.एम.सी. (५४.८६ टक्के) विसर्ग-०० क्युसेस (विद्युत), चित्री प्रकल्प- पाणीसाठा- o.९१. टी.एम.सी. (४८.५१ टक्के) विसर्ग-: ०० क्युसेस, (विद्युत), जंगमहट्टी प्रकल्प- पाणीसाठा- o. ६९ टी.एम.सी. (५६.७३ टक्के) विसर्ग- ०० क्युसेस, (सांडवा)

घटप्रभा प्रकल्प- आजचा पाणीसाठा- १.५६  टी.एम.सी. (१०० टक्के) विसर्ग- ५५९६ क्युसेक (विद्युत), जांबरे प्रकल्प-पाणीसाठा- ०.८२ टी.एम.सी. (१०० टक्के) विसर्ग- १७९० क्युसेक, (सांडवा); कोदे ल.पा.- पाणीसाठा- ०.२१ टी.एम.सी. (१०० टक्के) विसर्ग- ९७७ क्युसेस (सांडवा); आंबेओहोळ प्रकल्प- पाणीसाठा- o.८४ टी.एम.सी. (६७.५५ टक्के) विसर्ग- oo क्युसेस (सांडवा); राधानगरी धरण- पाणीसाठा ४.६० टी.एम.सी. (५३.६९ टक्के) विद्युत विसर्ग- १३५० क्युसेस (विद्युत)

कोयना प्रकल्प (क्षमता- १०५.३ टी.एम.सी.)- आजचा साठा ३५.०८ टी.एम.सी. (३३.३१ टक्के) आवक- ४३५५७ क्युसेस, जावक- ०० क्युसेस; अलमट्टी प्रकल्प (क्षमता- १२३.८ टी.एम.सी.) – आजचा साठा ८७.९९२ टी.एम. सी (७१.०७ टक्के), आवक -१०४८५२ क्युसेस, जावक- ५६९३६ क्युसेस; हिपरग्गी प्रकल्प (क्षमता ६.०० टी.एम.सी.) : आजचा साठा २.3८ टी.एम.सी. (3९.६७ टक्के), आवक- ७६००० क्युसेस, जावक- ७५००० क्युसेस.

राजापूर बंधारा पाणीपातळी ३४ फूट (इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी- ४३ फूट), नृसिंहवाडी पाणीपातळी- ४२ फूट ६’ इंच (इशारा पातळी ६५ फूट व धोका पातळी ६८ फूट), शिरोळ पाणीपातळी- ४४ फूट, (इशारा पातळी- ७४ फूट व धोका पातळी ७८ फूट), इचलकरंजी- पाणीपातळी- ५८ फूट, (इशारा पातळी- ६८ फूट व धोका पातळी ७१ फूट), तेरवाड पाणीपातळी- ५२ फूट, (इशारा पातळी- ७१ फूट व धोका पातळी ७३ फूट).