नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा समन्स बजावले आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना दि. २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.

कोरोनाशी लढा देत असलेल्या सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या काही आठवडे ईडीसमोर हजर राहू शकणार नाहीत, असे सांगण्यात आले. ईडीनेही त्यांची विनंती मान्य केली होती. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जुलैच्या अखेरीस चौकशी एजन्सीसमोर हजर राहून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते.