साखरसम्राटांना ‘दरोडेखोर’ म्हणणारे शेट्टी त्यांच्याबरोबर कसे गेले? : धैर्यशील माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे हित न पाहता स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी खा. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. आयुष्यभर ते साखरसम्राटांना ‘चोर, दरोडेखोर’ म्हणत आले आहेत. मग आता त्यांच्याबरोबर जाणाऱ्या शेट्टी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेनेचे नेते धैर्यशील माने यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना केला. 

शेट्टी यांनी स्वकेंद्रित राजकारण करून सत्ता ही चळवळीपेक्षा मोठी असते असा संदेश राज्यभर शेतकऱ्यांमध्ये दिला आहे. त्यांनी आयुष्यभर साखरसम्राटांना चोर दरोडेखोर म्हणाले आणि ही चळवळ चालवली, पण आता त्यांच्यासोबत जाऊन आघाडी करणारे राजू शेट्टी कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, असे ते म्हणाले.

आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असून येणाऱ्या २४ मार्चच्या प्रचार सभेची जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना नक्की जिंकणार असून मला जोरदार कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले असल्याचे माने यांनी सांगितले.

यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनाच लढणार असल्याचे निश्चित झाले असून जागाबदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला आहे.

One thought on “साखरसम्राटांना ‘दरोडेखोर’ म्हणणारे शेट्टी त्यांच्याबरोबर कसे गेले? : धैर्यशील माने”

  1. बहुजनांचा आधार… शिवसेनाच जिंकणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram