अल्पवयीन मुलांचा त्रास मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

टोप (प्रतिनिधी) : शिरोली औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील गावांना अच्छे दिन आले आहेत. तसेच परिसराला पंचगंगा नदी लाभल्याने संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि साक्षरता यांचे प्रमाण घटलेले दिसत आहे. आणि याचा फायदा स्थानिकांना होत आहे.

नँशनल हायवे नं. ४ लागुनच असलेले टोप (ता. हातकणंगले) गावात प्रत्येकाच्या घरी सर्रास मोटारसायकल पाहायला मिळते. मात्र गावातील अल्पवयीन मुलांचे मोटारसायकल चालवण्याचे प्रमाण वाढले असून अनुभव नसताना भरदार वेगात गावातून मोटारसायकली फिरवल्या जात आहेत. परिणामी गावात लहान मोठे अपघात होत आहेत. तसेच या मुलांकडून हायवेलाही गाड्या चालवल्या जात आहेत. टोप परिसरात अपघातांचे प्रमाण मोठे असल्याने अल्पवयीन मुलांना वेळीच रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कार्यावाही करावी अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.

तसेच मोटारसायकलच्या कारणापायी काही अल्पवयीन मुले आणि तरुण शाळा सुटण्याच्या वेळी, मधल्या सुट्टीत विनाकारण शाळेजवळ थांबत आहेत. शाळा प्रशासनाने कित्येक वेळा त्यांना सांगूनही काही फरक जाणवत नाही आहे. प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत पोलिस स्टेशनला कळवले असून तेथुन कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमधून संतप्त व्यक्त केला जात  आहे. अशा युवकांच्या कृत्याला वेळीच आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram