मौनी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ १९ मार्चला..!        

गारगोटी (प्रतिनिधी) : मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालय व आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांचा मंगळवार दि. १९ रोजी  पदवीदान समारंभ होणार आहे. येथील महात्मा फुले सभागृहात सकाळी १० वाजता या समारंभास सुरुवात  होईल, अशी माहिती मौनी विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. आर. डी. बेलेकर यांनी दिली.

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील  यांनी सांगितले की, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या नियमानुसार व शिवाजी विद्यापीठाच्या आदेशानुसार संलग्न महाविद्यालयात हा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे हे समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मौनी विद्यापीठाच्या विश्वस्त शालिनीताई देसाई अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाकडे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. पदवीदान समारंभानंतर कर्मवीर हिरे कला, वाणिज्य, विज्ञान व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे  विद्यार्थी-पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे