शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना फटका

गारगोटी (प्रतीनिधी) अजित यादव : भुदरगडच्या पश्चिम विभागातील कडगाव-पाटगाव येथील  चार केंद्र प्रमुख, पाच पदवीधर अध्यापक, चौदा अध्यापक अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे  प्राथमिक शिक्षणाची समस्या उद्भवली असून वाड्यावस्तीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. भुदरग तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील तब्बल ६२ पदे रिक्त आहेत आणि त्यापैकी २३ पदे ही कडगाव-पाटगाव विभागातील आहेत.

या मध्ये कडगाव, पाटगाव, शेळोली, वेसर्डे या चारही केंद्र शाळांमध्ये केंद्रप्रमुखांचे पद रिक्त असल्याने विभागातील सर्वच केंद्राच्या कामकाजावर याचा परिणाम होत आहे. पदवीधर अध्यापक पद अनफबुद्रुक, अनफवाडी, आडे, भटवाडी, सीमालवाडी या ठिकाणी रिक्त आहेत. तसेच  शिसेवाडी, सुतारवाडी, भालेकरवाडी, चांदमवाडी, मानी,सिध्दार्थनगर, तळीवाडी, सुतारवाडी, धुरेवाडी, देवर्डे, कोल्हेवाडी, डेळे, तळकरवाडी, मेघोली, धनगरवाडा, रब्बेवाडी याठिकाणीचे अध्यापक पद रिक्त आहे. तर काही ठिकाणी पटसंख्ये अभावी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

या परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये कायमच शिक्षकांची कमतरता असल्याचे या पूर्वीही स्पष्ट झाले आहे. परिणामी काही गोरगरीब विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने ही रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी पालकांतून होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram