‘संसदरत्न’ खासदारांमुळे जिल्ह्याचे किती प्रश्न सुटले ? : प्रा. संजय मंडलिकांचा हल्लाबोल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पैशाच्या जोरावर संसदरत्न मिळवणारे खा. महाडिक यांनी संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारल्याची टिमकी ते वाजवतात. परंतु त्यांच्या या प्रश्नांनी जिल्ह्याचे किती प्रश्न सुटले? असा हल्लाबोल प्रा. संजय मंडलिक यांनी केला. ते आज (गुरुवार) निगवे (ता. करवीर) येथे जाहीर सभेत बोलत होते. सेवा सोसायटीचे चेअरमन रामचंद्र जिंदगे अध्यक्षस्थानी होते. 

मंडलिक म्हणाले की, मागील निवडणुकीत बोटावरची शाई वाळायच्या आताच जनतेच्या आणि नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार करा. महाडिक कुटुंबीयांनी बाळासाहेब माने, रत्नाप्पा कुंभार ते सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत सर्वाना फसवले आहे. ‘संसदरत्न’ची टिमकी वाजवणाऱ्या महाडिकांना महिलांनी सभेसाठी यायला साड्या वाटाव्या लागतात, यातूनच त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे हे दिसून येते. महाडिकांच्या अशा फसव्या आमिषांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता भीक घालणार नाही. मी मंडलिकांचा  मुलगा आहे. मंडलिकांनी एकदा शब्द दिला की त्या शब्दासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शब्द फिरवणार नाही. देशात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर करण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन मंडलिकांनी  केले.

आर. एस. कांबळे यांनी स्वागत, डॉ. बाळू पाटील यांनी प्रास्ताविक केले. ‘बिद्री’चे ज्येष्ठ संचालक श्रीपती पाटील,  अशोक चिंदगे, जी. एस. पाटील, सुजय चव्हाण, अनिल पाटील, तुकाराम पाटील, अरूण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram