…अखेर ‘स्वाभिमानी’ महाआघाडीमध्ये : खा. शेट्टींनी मानले राष्ट्रवादीचे आभार !

कोल्हापूर (सरदार करले) : राष्ट्रवादी काँग्रेसने हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा देऊन आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता वर्धा आणि बुलडाणा या जागेबाबतचा पेच लवकरच संपुष्टात येईल, अशी प्रतिक्रिया खा. राजू शेट्टी यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत महाआघाडीमध्ये सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

’लाईव्ह मराठी’च्या वाचकांना फर्निचर खरेदीवर ३५ टक्के डिस्काऊंट

सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन

बाचूळकर फर्निचर

आजच भेट द्या…

एन एच – ४, कालेश मंदिरानजीक, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर.

संपर्क – 9890379444

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी काल (बुधवार) जाहीर केली होती. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या वेळी त्यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन आपला शब्द पाळला आहे. आता वर्धा आणि बुलडाणा या दोन जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामधील किमान एक जागा स्वाभिमानीला निश्चित मिळेल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे