‘राष्ट्रवादी’च्या पहिल्या यादीत महाडिकांसह ११ जणांचा समावेश : राजू शेट्टींंना पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत.  आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. धनंजय महाडिक, सुप्रिया सुळे, संजय दीना पाटील, सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत.

’लाईव्ह मराठी’च्या वाचकांना फर्निचर खरेदीवर ३५ टक्के डिस्काऊंट

सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन

बाचूळकर फर्निचर

आजच भेट द्या…

एन एच – ४, कालेश मंदिरानजीक, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर.

संपर्क – 9890379444

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील ४८ पैकी २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील ११ जागांचे उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर खा. राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला. यामध्ये चार विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक आणि मोहम्मद फैजल यांचा समावेश आहे.

उमेदवारांची नावे अशी – : रायगड – सुनील तटकरे,  बारामती – सुप्रिया सुळे,  सातारा – उदयनराजे भोसले, बुलडाणा – राजेंद्र शिंगणे, जळगाव – गुलाबराव देवकर, मुंबई उत्तर-पूर्व  – संजय दीना पाटील, कोल्हापूर – धनंजय महाडिक, परभणी – राजेंद्र विटेकर, ठाणे – आनंद परांजपे, कल्याण -बाबाजी पाटील, हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा, लक्षद्विप – मोहम्मद फैजल.

मावळसह काही जागांवर सस्पेन्स

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, पहिल्या यादीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांचे नाव जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत माढा, नगर, मावळ, शिरुर, बीड, गोंदिया  या बहुप्रतीक्षित मतदारसंघांच्या उमेदवाराबाबत घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram