‘तुमच्या वडलांचा पराभव करायला राजीव गांधींंनीच सांगितले होते..’ : आ. आव्हाड

मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवरून झालेला विखे पाटील-पवार वाद शमण्याची शक्यता नाहीये. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. याला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. तुमचे वडील बाळासाहेब विखे- पाटील यांचा पराभव करायला राजीव गांधी यांनी सांगितलं होतं. पवारांनी ते काम कार्यकर्ता म्हणून पार पाडले, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब विखे- पाटील यांचा पराभव करायला राजीव गांधी यांनी सांगितलं होतं. केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांनी ती जबाबदारी पार पाडली, असे सांगत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये. भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांनी आघाडी धर्म शिकवू नये’, असा टोला देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विखे-पाटलांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram