‘नमो-रागां’च्या समर्थकांत ‘मूर्ख’ ठरविण्याची स्पर्धा..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रचाराला लागलेत. मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी एकमेकांवरील टीकेला जोर येणार आहे. सोशल मीडियावरही हे प्रचारयुद्ध रंगात येऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि जनसंपर्क विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी एक मिम ट्विट केले असून यामध्ये त्यांनी मोदीसमर्थकांना लक्ष्य केलेय. मोदींच्या तीन भक्तांपैकी एकजण इतर दोघांइतकाच मूर्ख असतो, असा संदेश मोदींच्या छायाचित्राखाली लिहिण्यात आला आहे. 

स्पंदना यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर मिळणार नाही असे कसे होईल ? एका मोदी समर्थकाने म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे का, राहुल गांधींच्या तीन समर्थकांपैकी तिघेही राहुल गांधींइतकेच मूर्ख आहेत. यानंतर स्पंदना यांना मोदी समर्थकांंनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. त्याचबरोबर काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

स्पंदना यांच्याकडून मोदींवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर महिन्यात एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘चोर’ असा केल्यामुळे दिव्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता स्पंदना यांनी अशा प्रकारचे ट्वीट करून आणखी वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांच्या समर्थकांत एकमेकांना ‘मूर्ख’ ठरविण्याच्या स्पर्धेला आता आणखी रंग चढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram