मी नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : नगरमध्ये मी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. ज्या शरद पवार यांच्या मनात आमच्या विखे – पाटील घराण्याविषयी द्वेष आहे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. त्याचप्रमाणे मी पद सोडणार नाही. माझ्या पदाबाबतचा निर्णय हाय कमांड घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे सुपुत्र डॉ. सुजय यांनी अखेर दोनच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (गुरुवार) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

’लाईव्ह मराठी’च्या वाचकांना फर्निचर खरेदीवर ३५ टक्के डिस्काऊंट

सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन

बाचूळकर फर्निचर

आजच भेट द्या…

एन एच – ४, कालेश मंदिरानजीक, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर.

संपर्क – 9890379444

डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. यावरून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. विखे-पाटील यांच्यावर पक्षातील विरोधकांनी टीका केली. विशेषतः त्यांचे पारंपरिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी विखे – पाटील यांना राजीनामा द्यावा आणि पुढील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, नगरच्या जागेवरून अनेकदा दोन पक्षाच्या नेत्यांत चर्चा झाली. दोन्ही जागा काँग्रेसकडे राहिल्या असत्या तर काही बिघडत नाही. शेवटी महाआघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. सध्या हयात नसलेल्या माझ्या वडिलांबद्द्दल- बाळासाहेब विखे – पाटील यांच्याबद्दल शरद पवार यांनी दोनवेळा केलेलं विधान चुकीचे होते. भाजपत जाण्याचा निर्णय सुजयचा होता. मी नगरमध्ये सुजयचा प्रचार करणार नाहीच पण राष्ट्रवादीचाही प्रचार करणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. ते काही हाय कमांड नव्हेत. त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram