#MeToo : युवा अभिनेत्री म्हणाली, ‘होय, माझंही शोषण झालंय..’

मुंबई (प्रतिनिधी) : लैंगिक शोषण ही गोष्ट आज खूपच सामान्य झाली आहे की महिलांनी त्याला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणूनच स्वीकार केला आहे. मी ज्या गोष्टींना सामोरे गेले, जे निर्णय घेतले त्यावरून कोणी माझ्याबद्दल मत तयार करावं असं मला वाटत नाही. माझ्या जवळच्या व्यक्तींना मी त्याबाबत सांगितले आहे, असे सांगत ‘दंगल गर्ल’ फातिमा शेखने आपलेही लैंगिक शोषण झाले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

फातिमाने फिल्म इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाबाबत एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. #MeToo मोहिमेवर तुझं काय मत आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे. माझ्या आयुष्याशी निगडीत त्या गोष्टी मला सार्वजनिकरित्या सांगायची इच्छा नाही. मी स्वत: त्या गोष्टींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय असे तिने म्हटलंय.

गतवर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत इंडस्ट्रीतील मोठी नावं समोर आली. आलोक नाथ, कैलाश खेर, साजिद खान, सुभाष घई यांसारख्या बड्या कलाकारांवर आरोप झाले. फातिमाने बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या मीटू मोहिमेची प्रशंसा केली. या मोहिमेमुळे शोषण करणाऱ्या लोकांची नावं समोर आली. त्यामुळे सार्वजनिकरित्या आपलं नाव खराब होऊ नये अशी भीती त्यांना वाटू लागली आहे,’ असं ती पुढे म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे