चंदकांत चषक : अटीतटीच्या लढतीत संयुक्त जुना बुधवार विजयी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या चंद्रकांत फुटबॉल स्पर्धेत आज झालेला सामना  अटीतटीचा ठरला. ‘शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार’ या सामन्यामध्ये ‘सडन डेथ’ मध्ये शेवटच्या फटक्यावर जुना बुधवारने अत्यंत चुरशीचा ठरलेला हा सामना जिंकला. १-० ने ‘सडन डेथ’मध्ये सामन्याचा निकाल जुना बुधवार संघाच्या बाजूने लागला.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांच्या बचाव फळीचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या हाफमध्ये शिवाजीच्या संदीप पोवारने ६८ व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून सामना आपल्या बाजूने वळवला. शिवाजी मंडळाचा हा आनंद फार काळ टिकू न देता जुना बुधवारच्या रोहन कांबळेने ७१ व्या मिनिटाला गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर गोल न होऊ शकल्याने सामन्याचा निकाल ट्रायब्रेकवर गेला.

शिवाजीच्या संदीप पोवार, आकाश भोसले, सॅनो पॅट्सो यांनी गोल नोंदवले. तर जुना बुधवारच्या सुशील सावंत, हरीश पाटील, दिग्विजय सुतार यांचा फटका शिवाजीचा गोलकीपर निखील खन्ना वाचवू शकला नाही. यामुळे ट्रायब्रेकरही बरोबरीत सुटले. यानंतर सामन्याचा निकाल ‘सडन डेथ’वर अवलंबून होता.  यामध्ये संयुक्त जुना बुधवारचा किरण कावणेकरने गोल केल्यामुळे जुना बुधवार संघाने ‘सडन डेथ’वर सामना १-०  ने जिंकला.

One thought on “चंदकांत चषक : अटीतटीच्या लढतीत संयुक्त जुना बुधवार विजयी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram